शाश्वत विकासातून गावाला आदर्श करू -आमदार रहांगडाले यांचे प्रतिपादन

0
9

ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत केंद्रीय चमूची घोगरा ग्रामपंचायतीला भेट

तिरोडा,दि.18 : गावे विकासाचा कणा आहेत. सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील तीन गावांची ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत निवड करण्यात आली आहे. गावातील मागासपणा दूर व्हावा, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून गावाला शाश्वत विकासातून आदर्श करण्याचे आवाहन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत केंद्रीय चमूने आज, १८ एप्रिल रोजी तिरोडा तालुक्यातील घोगरा ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक तथा समितीच्या प्रमुख फरीदा नाईक, संरक्षण मंत्रालयाचे अवर सचिव तथा समितीचे सदस्य जितेंद्र प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, पं.स. उपसभापती मनोहर राऊत, घोगराचे सरपंच गिता देव्हारे, उपविभागीय अधिकारी जी.एम. तळपाडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी. पारखे, तिरोडाचे तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी जावेद इनामदार यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सौभाग्या योजना, उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष या योजनांचे शंभर टक्के उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने समितीला नोडल अधिकारी नेमूण तपासणीसाठी पाठविले आहे. तिरोडा तालुक्यातील घोगरा, आमगाव तालुक्यातील कुंभारटोली आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी या गावांची योजनेंतर्गत निवड करण्यात आली. गावांचा विकास करताना काही प्रातिनिधीक गावे तयार करावी लागतात. सात निकषांच्या आधारे जिल्ह्यातील तीन गावांची निवड करण्यात आली. आपले गाव चांगले आहे. येत्या वीस दिवात सर्वच योजना आपल्या गावात राबविण्यात येणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनातून केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती देऊन शेअरींग व नादुरुस्त शौचालयांचा आकडा शून्यावर आणण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकार डॉ. राजा दयानिधी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. समितीचे गावात आगमन झाल्यावर भिमनगर येथे घरकुल बांधकाम तथा शेअरींग शौचालयाचा वापर करणाºया तीन महिलांचा यापसंगी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. भेटी दरम्यान समितीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात विविध उपक्रमांची माहिती दिली. गावकºयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तथा अंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्र येथे भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी केले.