स्वातत्र्य संग्राम सैनिक सोहनलाल मिश्रा यांच्या स्मृतित वकीलांचा सत्कार 

0
8
गोंदिया,दि.१९ : ब्राम्हणांनी संस्कार व कष्टाच्या बळावर संघर्षातून जगातल्या कानाकोपèयात प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून इतिहास घडविला आहे. आता विद्यमान स्पर्धेच्या युगात प्रगती करायची असल्यास ब्राम्हण युवक-युवतींनी स्वतःला व समाजाला पुढे नेण्यासाठी यशस्वी उद्योजक होण्याचा संकल्प करून देश व समाजाप्रती सामाजिक बांधलिकी जपावी, असे प्रतिपादन सार्थक महाराष्ट्रीयन ब्राम्हण उद्योजक मंडळाचे अध्यक्ष आनंद घारे यांनी केले.
ते भगवान परशुराम जयंतीनिमित्त १८ एप्रिल रोजी समग्र ब्राम्हण सभेतर्फे स्वातंत्र्य सैनिक व माजी नगर परिषद उपाध्यक्ष सोहनलाल मिश्रा यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित वकीलांच्या सत्कार समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सिव्हील लाईन येथील महिला मंडळ परिसरात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बहु. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष शैलेंद्र अवस्थी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अ. भा. बहु. ब्राम्हण महासंघाचे प्रदेश सचिव श्री गोटे, जगदीश सोहनलाल मिश्रा, समग्र ब्राम्हण सभेचे संयोजक प्रा. निलेश चौबे, विजय अडीचवार इंदोर, समग्र ब्राम्हण सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मांगीलाल शर्मा, महेश पुरोहित, भिकम शर्मा उपस्थित होते. सर्वप्रथम भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी अ‍ॅड. बीना बापजेई, अ‍ॅड. अनिता बाजपेई, अ‍ॅड. अर्चना पांडे, अ‍ॅड. अशोक मिश्रा, अ‍ॅड. चंद्रकिरण व्दिवेदी, अ‍ॅड. विनोद जानी, अ‍ॅड. अनंत दीक्षित, अ‍ॅड. सुजाता तिवारी, अ‍ॅड. गिरीश बापट, अ‍ॅड. के. एच. मराठे, अ‍ॅड. रमाशंकर राय, अ‍ॅड. रंजीता शुक्ला, अ‍ॅड. संजय व्दिवेदी, अ‍ॅड. प्रसाद बेडेकर, अ‍ॅड. प्रणिता कुळकर्णी, अ‍ॅड. दाऊ यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त पुजा तिवारी, पॉवर लिप्टींगमध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल निलम सौरभ शुक्ला व राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जयंत शुक्ला यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील प्रथम विजेती भूमी कपूर व व्दितीय इशिता मिश्रा आणि संगीत खुर्ची स्पर्धेतील प्रथम विजेता चंदा मिश्रा व व्दितीय मंजुलता शुक्ला यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अतुल दुबे, राजेश दवे यांनी केले. तर आभार अरूण दुबे यांनी मानले