एमगिरीतील केमिकल युनिटला भीषण आग

0
8

वर्धा दि.१९ :: येथील रामनगर भागातील एमगिरी परिसरातील केमिकल युनिटला गुरूवारी सायकांळी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात विविध साहित्य जळून कोळसा झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसली तरी यात सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
गुरूवारी एमगिरी भागातील केमिकल युनिटमधून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने घटनेची माहिती एमगिरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत न.प.च्या अग्निशमन विभागाला दिली. सुरूवातीला एमगिरीतील कर्मचाऱ्यांनी आग प्रतिबंधक सिलिंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करीत अर्ध्या तासाच्या कालावधील आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत केमिकल युनिटमधील फर्निचर, विविध प्रकारचे रसायन आणि इतर साहित्य जळाल्याने सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे एमगिरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.