अाल्लापाल्ली नागेपल्ली पाणी पुरवठ्याचे भूमिपूजन 

0
12

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.20 : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही मी देतो, असे प्रतिपादन पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी केले. आलापल्ली-नागेपल्ली साठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ९.१३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आज त्यांचा हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरी पंचायत सभापती सुरेखा आलाम, पंचायत समिती उपसभापती राकेश तलांडे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता कुसनाके, पंचायत समिती सदस्य योगिता मोहुर्ले, नागेपल्ली-आलापल्ली सरपंच आदी उपस्थित होते.
अहेरी सोबतच आल्लापल्लीचा विकास व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, नागेपल्लीच्या पाणीपुरवठ्याची मागणी असताना गेल्या ३० वर्षांत यासाठी निधी देण्यात आला नाही. आता तो उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात लेखा मेंढा, कुरुड तसेच येनापूर आदी ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना सुरु होणार आहे. नागेपाल्लीच्या या योजनेचे भूमिपूजन करताना मला विशेष आनंद होत आहे.
अहेरीहून कुठेही जायचे असेल तर आल्लापल्लीहूनच जावे लागते त्यामुळे आलापल्लीचाही विकास व्हावा अशी आपली भूमिका आहे. याचे पुढील पाऊल म्हणून आलापल्ली बसडेपोची मागणी देखील महिनाभरात पूर्ण होईल असे सुतोवाच त्यांनी केले.