खासदार वरुण गांधींच्या उपस्थितीत २१ एप्रिलला नागपूरात युवा परिषद

0
10

नागपूर,दि.20ःभारत हा जरी युवकांच्या बहुसंख्येचा देश म्हनुन ओळखल्या जात असला तरी आजच्या स्थितीत युवावर्ग हा दुर्लक्षित व चिंतेत असलेला घटक आहे. तसेच शिक्षण व रोजगाराच्या बाबतीतही असमाधानी आहे. विकासाचे क्षेत्र विस्तारीत होत असताना युवा वर्गास मात्र त्यात पुरेसे प्रतीनीधित्व मिळताना आढळत नाही, त्यामुळे नवनीर्मीती चा हा सर्वात प्रभावी घटक वंचित राहताना दिसत आहे. कधी – कधी या उर्जेला नकारात्मक दिशेने वळवुन त्याचा वापर राजकारणात वळवण्यात काही घटक यशस्वी होताना दिसत असल्याने या सर्व आव्हानाना पार करत विधायक दिशेकडे युवकांची आगेकुच होने ही काळाची गरज आहे. या सर्व संदर्भाने युवावर्गाशी एक सकारात्मक संवाद स्थापित करणे व त्यांच्या आकांक्षा व भविष्यातील दृष्टीने समन्वय साधण्याचे उद्देशाने २१ एप्रिल २०१८ रोजी १२ ते ४.०० वाजेपर्यंत युवा मुक्ती अभियान विदर्भ प्रदेश चे वतीनी नागपुर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात युवा सम्मान संवाद ही विदर्भातील युवकांची परिषद आयोजीत करण्यात आलेली आहे.
युवा मुक्ती अभियान ही विदर्भातील युवावर्गाला सर्व समावेशी व सर्वांगीण विकास व जबाबदार नागरिक म्हनुन सकारात्मक मार्गदर्शन करणारी एक स्वयंसेवीयुवा प्रक्रिया आहे. विदर्भातील कार्यरत स्वयंसेवी कृती करणाऱ्या युवा घटकांचा एकात्मिक मंच आहे. या परिषदेचे उद्घाटक व मुख्य अतिथी युवा खासदार वरून गांधी हे राहणार असून  महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र राहतील. परिषदेला मार्गदर्शक म्हणुन दिल्ली येथील प्रख्यात आंबेडकरी विचारवंत अशोक भारती, हरियाणा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बहादूर, युगांतर शिक्षण संस्था चे अध्यक्ष राजकूमार तिरपुडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन चौधरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुरच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. केशव वाळके हे उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत विदर्भातील सामाजिक जबाबदारीतून विधायक कार्य करणाऱ्या युवकांचा युवा कृतज्ञता पुरस्कार देउन गौरव करणार असून यात महेश पवार यवतमाळ, मारोती चवरे वर्धा, गौरव टावरी नागपूर, संजीवनी पवार अमरावती, प्रशांत डेकाटे नागपूर व श्रीकांत भोवते गोंदिया यांचा समावेश आहे.