प्रपत्र अ व ब चे जुने बिल काढून रक्कम गहाळ करणारी टोळी सक्रीय

0
23

जि.प.बांधकाम विभागातील तथाकथित कर्मचाèयासह कंत्राटदाराचा समावेश
बेरार टाईम्सने यापुर्वीही वेधले होते लक्ष्य
गोंदिया,दि.२३ः-गोंदिया जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.त्यातच या विभागातील काही कर्मचाèयांच्या गैरवर्तणुकीमुळे गेल्या पंधरा दिवसात त्या कर्मचाèयांची आस्थापनाही बदलण्यात आली.परंतु मग्रुर असलेल्या त्या कर्मचाèयांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवित बांधकाम विभागातच काम सुरु ठेवलेले असतानाच या विभागात प्रपत्र अ व ब मधील काही कामांच्या मोजमापपुस्तीका गहाळ करुन त्या कामांचे देयके काढून देणारी टोळीच सक्रीय असल्याचे प्रकरण समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत सन २०१० ते २०१२ या दरम्यान पपत्र अ व ब ची काही कामे करण्यात आली होती.ती कामे केली एकाने परंतु त्या कामाची मंजुरी ही सुशिक्षित बेरोजगार युवक व संस्थेच्या नावाने असायची.परंतु काम करणारा हा दुसराच व्यक्ती असायचा.उदाहरणादाखल तेढा- तुमसर या रस्त्याचे खडीकरण करावयाचे काम मंजुर झाले ते ३-५ लाख रुपयात.हे काम मंजुर झाले अबक या सुशिक्षिक बेरोजगार अभियंत्याला.मात्र हा अभियंता कधीच काम करीत नाही प्रत्यक्ष त्यामुळे त्यांने विकले रामाला.आणि रामाने ते काम पुर्ण करुन बिल बांधकाम विभागाला दिले.त्यावेळी निधी नसल्याने ते बिल पेंडीग मध्ये गेले आणि जेव्हा निधी येईल तेव्हा मिळेल या आशेवर रामा राहिला.मात्र जेव्हा केव्हा निधी आला याची माहिती त्या विभागात कार्यरत कर्मचाèयांना असते अशात २०१० ते १२ दरम्यानच्या काही कामासाठींचा निधी आल्याची माहिती मिळताच या विभागातील काही कर्मचाèयांनी काही कंत्राटदारांना हाताशी धरुन ते बिल तयार करुन तो निधी संबधित सुशिक्षत बेरोजगार व संस्थेला त्याचे कमीशन देऊन ती रक्कम आपल्या ताब्यात घेत मोठा घोळ केल्याचे प्रकरण उघडकीस येऊ लागले आहे.गोंदिया शहरातील एका प्रतिष्ठित कंत्राटदाराने एक काम गोरेगाव तालुक्यातील चोपा तेढा परिसरातील एका कंत्राटदाराच्या नावावर घेतले होते.त्या कंत्राटदाराचे अचानक अपघाती निधन झाले.त्यानंतर गोंदियातील सिव्हीललाईन भागात राहणाèया त्या कंत्राटदाराकडे काही लेखी करार नसल्याचा लाभ घेत गोंदियातीलच एका गड्डाटोली निवासी कंत्राटदाराने अपघातात मृत्यू झालेल्या आणि ज्याचे नावे ते काम होते त्या कंत्राटदाराच्या पत्नीला हाताशी धरुन ते बिल काढल्याची चर्चा आहे.असे अनेक प्रकार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सर्रास होत आहेत.त्यामध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील एक कर्मचारी महत्वाची भूमिका पार पाडत असल्याची चर्चा असून या विभागात काही कर्मचारी व कंत्राटदारांची टोळी सक्रीय झाल्याची चर्चा आहे.त्यातच आता मिळालेल्या माहितीनुसार अनिल शेंडे नामक एका कंत्राटदाराची मोजमाप पुस्तीकाच गहाळ त्या विभागातून झाली आहे.जेव्हा त्या कंत्राटदाराने त्या विभागातील एका कर्मचाèयाला धाक दाखविला तेव्हा त्या कर्मचाèयांने नेवारे नामक एका व्यक्तीनी ती मोजमाप पुस्तिका विभागातील कर्मचाèयाला हाताशी धरुन गहाळ केल्याची धक्कदायक बाब समोर आली असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी,अति.मुुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे आणि बांधकाम विभागाचे कार्य.अभियंता व सभापती हे मूग गिळून का बसले हे कळायला मार्ग उरलेला नाही.त्यातही बेरार टाईम्सने यापुर्वीही असे प्रकार या विभागात घडत असल्याचे समोर आणले होते.त्याकडे दुर्लक्ष केले गेले आता बेरार टाईम्सने सामाजिक दायित्व म्हणून याप्रकरणाची सविस्तर चौकशीची मागणी संबधित कर्मचारी यांच्या नोकरीला लागलेल्या काळापासून आजपर्यंतंच्या संपत्तीच्या विवरणाची तपासणी करुन योग्य कारवाईसाठी मुख्यमंत्री यांच्या आपले सरकार पोर्टलवरच तक्रार करीत सर्वसामान्य कंत्राटदारांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.