तिरो़डा बीडीओ ईनामदारांच्या गाडीला अपघात

0
19
तिरोडा,दि.27ः-येथील पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जावेद इनामदार हे आपल्या शासकीय वाहनाने गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयात आयोजित स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी जात असताना समोरून येणार्या वाहनाला ईनामदार बसलेल्या वाहनाने अदानीजवळील रामाटोला गावाजवळ धडक दिल्याने अपघात घडला.यामध्ये शासकीय वाहनाने खासगी गाडीला दिलेल्या धडकेत त्या गाडीचे समोरचे चाकच निघाले.या अपघात बीडीओ जावेद इनादार यांना किरकोळ जखमा झाल्या असून कुठलीही जिवित हानी झालेली नाही.मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.स्थानिकांनी लगेच धाव घेत मदत केली.