सामुहिक विवाह सोहळा आदर्श समाज घडवतो

0
10

गोरेगाव दि.२८ः: मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते. कमी खर्चात व अल्पवेळात सामुहिक विवाह सोहळा आदर्श समाज घडवून आणतो. सामुहिक विवाह सोहळा समाज एकत्र आणण्याचे काम करतो, असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी व्यक्त केले.
गोरेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे आयोजित आदिवासी हलबा/हलबी सामूहिक विवाह सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. आदिवासी संघटनेचे डॉ. नामदेवराव किरसान व त्यांच्या समितीच्या आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात २० जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी आदिलोक युवा मंचतर्फे भारतीय संविधान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रामरतन राऊत, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आ. दिलीप बन्सोड, माजी आ. हेमंत पटले, केंद्रीय अध्यक्ष श्रावण राणा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. के.आर. शेंडे, उषा मेंढे, शिवलाल गावड, विजय राणे,अमर वºहाडे, छत्तीसगडचे आदिवासी समाजाचे केंद्रीय सचिव किसन मानकर, ओ.एस. जमदाळ, जिल्हा परिषद सदस्य भोजराज चुलपार, माजी जिल्हा कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, गोरेगावच्या नगराध्यक्ष सीमा कटरे, न.प.उपाध्यक्ष आशिष बारेवार, विरेंद्र जायस्वाल, माजी जि.प.सदस्य जगदीश येरोला, सभापती मलेशाम येरोला, जे.टी. दिहारी, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, माजी सभापती देवराज वडगाये, माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, पं.स. सदस्य केवल बघेले, पी.पी. कोरोंडे, यु.जी. फरदे, एस.आर. चनाप, माजी तहसीलदार खुशाल खुटमुडे, उपमुख्याधिकारी सी.ए. राणे, एन.एम. किरसान, हौसलाल रहांगडाले, सी.आर. भंडारी, एम.बी. दमाहे, तुलाराम मारगाये, रामू औरासे, महेंद्र दिहारे, विनोद उके, मधुकर किरसान उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान, रामचंद्र फरदे, अजय कोटेवार, एच.बी. राऊत, वाय.सी. भोवर, मुलचंद खांडवाये, एस.सी. भोयर, विरेंद्र चाकाटे, सूरज कोल्हारे, प्रभूदयाल मसे, विजय कोटेवार, बी.एस. वडेगावकर, सुभाष चुलपार, टी.एम. बिसेन, कारु फरदे, भरत घासले, शंकर कोटेवार, आरती चवरे, शिवशंकर, राऊत, जी.एस. खांडवाये, यादोराव कळाम, डी.जी. कोल्हरे, एम.आर. राऊत, चैतराम कोल्हारे, शंकर राऊत, छगन कोल्हारे, देवेंद्र राऊत, कपील किरसान यांनी सहकार्य केले.