गोदिया,कुरखेडा, गडचिरोलीत गारपीटीसह वादळी पाऊस

0
11

गोंदिया,दि.20-उन्हाऴयाची चाहूल लागत असतानाच आज(ता.२०) दुपारी ४ वाजतानंतर अचानक गोंदिया,भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस आला. यामुळे आंब्याचा मोहर गळून पडला असून, हरभरा व अन्य पिकांचेही नुकसान झाले आहे.
आज दुपारपर्यंत कडक उन्ह होते. परंतु दोन वाजतानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतर ४ वाजताच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. गोंदिया ,देवरी,पवनी,साकोली,आरमोरी, देसाईगंज येथे तुरळक पाऊस पडला, तर तिरोडा,गोरेगाव,तुमसर, गडचिरोली व कुरखेडा येथे अर्धा तास पावसाच्या सरी बरसल्या. गोंदिया व गडचिरोली जिल्हयात काही ठिकाणी गारपीटही झाली. वादळामुळे चौकात बॅनर, पोस्टर्स व झाडांच्या फांद्याही तुटल्या. कुरखेडा येथेही जोरदार गारपीट झाली. यंदा जिल्हाभरात आंब्याला चांगला मोहर आला आहे. मात्र आजच्या अवकाळी पावसामुळे मोहर गळून पडला. पावसाचा फटका बसला. शिवाय हरभरा व अन्य रब्बी पिकाचेही नुकसान झाले. मात्र उन्हाळी धानपिकाला या पावसाचा फायदा होणार आहे.