सीबीआयचा कोळसा घोटाळा प्रकरणी अहवाल सादर

0
10

नवी दिल्ली : कोळसा खाणी वाटपामध्ये उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि अन्य जणांच्या सहभाग प्रकरणामध्ये केंद्रिय अन्वेषण विभागाने आपला अंतिम तपास अहवाल विशेष न्यायालयामध्ये सादर केला. त्यात एका साक्षीदाराची साक्षही घेण्यात आली आहे.

सीबीआयने विशेष न्यायाधीश भारत पराशर समोर सीलबंद पाकिटामध्ये उत्तर सादर केले आहे आणि म्हटले की प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला आहे. न्यायालयाच्या आदेशावर तपासाचा शेवटचा अहवाल सादर केल गेला आहे.

न्यायालयाने १६ डिसेंबर २०१४ ला समापन अहवाल स्विकारण्यास नकार देत सीबीआयला आदेश दिला होता की त्यांनी या प्रकरणामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे उत्तर सामील करावे. ते त्यावेळी कोळसा मंत्रालयाची जबाबदारी संभाळत होते. प्रकरणाची पुढील सुनवाई १२ मार्चला होईल. मागील सुनवाईमध्ये संस्थेने प्रकरणचा तपासा संबंधामध्ये विविध लोकांचे उत्तरे नोदविली होती. सीबीआयने बिर्ला, माजी कोळसा मंत्री.पी.सी.पारेख आणि अन्यावर ऑक्टोंबर २०१३ मध्ये कोळसा खाणी वाटप दरम्यान गुन्हेगारी षडयंत्र रचने आणि भ्रष्टाचार सारखे गुन्हे नोंदविले होते.