पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

0
11

गडचिरोली,दि.03: महाराष्ट्र दिन /कामगार दिनाच्या निमित्याने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील एकलव्य इमारतीत आयोजित कार्यक्रमात जिल्हातील विविध क्षेत्रात उत्तम कामगीरी करणाऱ्यानाचा सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे या कार्यक्रमात 3 मार्च रोजी जगभरात शांतीचा संदेश देण्यासाठी भारतात पहिल्यांदाच पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली,आदर्श मित्र मंडळ ,लक्ष्मी नृरसिह पतसंस्थेच्या संयुक्त सहभागातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शांतीचां संदेश देण्यासाठी टर्की ,या देशात 5 हजार नागरिक एकत्र येत जागतिक विक्रम नोंदविला होता.भारतातून अतिसंवेदशीनल नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीची निवड करुण पोलीस अधीक्षक मैदानात 7 हजार 41 अधिकारी, विद्यार्थी,पालक शिक्षक, सामान्य नागरिक मोठ्या उत्साहात एकत्र येवून शांतीचा संदेश वाचनाचा टर्की या देशाचा जागतिक विक्रम मोडून काढला.त्यासाठी जिल्हा पोलीस अधिकारी,कर्मचारीसह पतसंस्थेचे अधिकार्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून 1 में रोजी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते 102 अधिकारी कर्मचारी यांचे प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी गडचिरोली अप्पर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित,महेश्वर रेड्डी,डॉ हरी बालाजी, उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्मचारी आणि आदर्श मित्र मंडळचे उदय जगताप,नरसिंह पतसंस्थाचे श्रीनिवास चुंचुवार,मैत्री संस्था,तसेच आलापल्ली शहराचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.चरणजीतसींग सलूजा,किरण तारे मंदार उपस्थित होते. या कार्यक्रमात दूरदर्शनचे गड़चिरोली जिल्हा प्रतिनिधी ओमप्रकाश चुनारकर यांचाही सत्कार पोलीस अधिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.