28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ पुराड़्याजवळ माओवाद्यांनी जाळले आॅटो

पुराड़्याजवळ माओवाद्यांनी जाळले आॅटो

0
26

गोंदिया,दि.5ः-गोंदिया जिल्हयातील नक्षसग्रस्त असलेल्या सालेकसा पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या पुराडा येथे शुक्रवारच्या रात्रीला अज्ञात 3 ते 5 माओवाद्यांनी गावात येऊन एका आॅटोला आग लावल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणी उईके नामक व्यक्तीचा तो आटो असून चार ते पाच वर्ष जुना होता.यासंदर्भात सालेकसा पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहितीही हाती आली आहे.