अर्जुनी मोरगाव दि.१८-(संतोष रोकडे): आगामी २८ मे रोजी होऊ घातलेल भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून निवडणुकीत अधिक पारदर्शकता यावी, म्हणून अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयात उपविभागीस अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांच्या हस्ते (दि.१७) मतदार जागृती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसीदार धनंजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाअतंर्गत ६३ अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात होणार्या लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर प्रथमच होत असल्याने अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना व्हीव्हीपॅट यंत्राच्या बाबतीत माहिती व जनजागृती करीता तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथील पटांगणात मतदार जागृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर मतदार जागृतीसाठी फिरते मतदान केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. मतदारांच्या व उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्या सहहाय्यासाठी आचारसंहितार कक्ष व मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
निवडणूक लढणारे उमेदवारांकरीता सभा,रॅली, वाहन परवानगीसाठी एक खिडकी योजना व आचार संहिताची प्रभावी अंमलबजावणीसठी स्थायी पथके, चेकपोस्ट, फिरती पथके आदिंची स्थापना करण्यात आली आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातल सर्व मतदारांना या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजािविण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले आहे.





