27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठित

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठित

0
42

चंद्रपूर,दि.21ः-श्रमिक पत्रकार संघाची द्विवार्षिक आमसभा रविवारी २0 मे रोजी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडली. यावेळी पत्रकार संघाची पुढील दोन वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी साम टिवीचे चंद्रपूर गडचिरोली ब्युरोचिफ संजय तुमराम यांची तर सरचिटणीस पदी दैनिक लोकशाही वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्‍वर यांची सलग दुसर्‍यांदा निवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी प्रशांत देवतळे(पुण्यनगरी), कोषाध्यक्षपदी जितेंद्र मशारकर (महासागर), संघटन सचिवपदी साईनाथ सोनटक्के (सकाळ), सहसचिवपदी सुशील नगराळे (तरूण भारत), यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार मोहन रायपुरे(लॉर्ड बुध्दा टीवी), देवानंद साखरकर(प्रेस फोटोग्राफर), एजाज अली (नवभारत), विनोद बदखल (देशोन्नती), खुशाल हांडे(सर्च टीव्ही.)यांची अविरोध निवड करण्यात आली. सरचिटणीस प्रशांत विघ्नेश्‍वर यांनी अहवाल वाचन केले. तर कोषाध्यक्ष मजहर अली यांनी जमाखर्च व हिशेब तपासणीचा अहवाल मांडला. मावळते अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून सुनील देशपांडे तर साहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून मोहन रायपुरे यांनी भूमिका पार पाडली. यावेळी मावळते अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी संजय तुमराम यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करीत पदभार सोपविला.
या प्रसंगी अनेक विषयांवर चर्चा करण्यात येऊन महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. चर्चेत सहभागी पत्रकार संजय तायडे,हेमंत डोर्लीकर,रवि जुनारकर, अरूण सहाय यांनी वेळोवेळी केलेल्या सुचनेचे स्वागत सभेने केले.