समता संग्राम परिषदेचा मोर्चा २७ जुलै रोजी

0
12

गोंदिया,दि.26 : येथील समता संग्राम परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी येत्या २७ जुलै रोजी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनादरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतील विधवांची पेंशन वाढविणे, ग्राम रोजगार सेवकांच्या कमिशनमध्ये वाढ, घरकुल योजनेचा लाभ गरजूंना द्यावा, शहरातील गरजूंना जमीन व घरांचे पट्टे द्यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शिष्यवृत्ती द्यावी, डीबीटी शिष्यवृत्ती बंद करावी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी वसतिगृह सुरू करावे, केंद्र व राज्यातील नोकर्‍यांवर लागलेली बंदी दूर करून भरती घेण्यात यावी, अँट्रॉसिटी अँक्टमध्ये हटविलेली कलम समाविष्ट करावी व सरकारी नोकरीत पदोन्नती आरक्षण द्यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. यासाठी समता संग्राम परिषदेच्या वतीने बैठक घेऊन २७ जुलै रोजी मुंबई येथील पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा ठराव घेण्यात आला. बैठकीला परिषदेचे संयोजक प्रा. सतीश बन्सोड, जिल्हाध्यक्ष विनोद मेश्राम, सचिव राजू राहुलकर, एस.डी. महाजन, वामन मेर्शाम, जीवन खोब्रागडे, किरण फुले, इंद्रराज भालाधरे, शोभेलाल राऊत, मिलिंद भालाधरे आदी उपस्थित होते.