पुसू झरु हेड्डो यांचे गावकऱ्यांनी उभारले स्मारक

0
6

गडचिरोली,दि.26 : नक्षलांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून 15 मे 2010 रोजी पुसू हेडो याची हत्या केली होती. या हत्येच्या निषेधार्थ परपनगुडा येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन नक्षलांचा निषेध व्यक्त करीत पुसू हेडो यांचे गावात स्मारक उभारले. यावेळी हेडो यांच्या कुटुंबीयांनी नक्षलवाद्यांनी आपल्या कर्त्या माणसाची हत्या करून आपले कुटुंब उद्धवस्त केल्याचे सांगून नक्षलवाद्यांनी आदिवासी लोकांवर अन्याय करणे थांबवावे असे विचार मांडले. यावेळी उपस्थितांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर आक्रोश व्यक्त करून नक्षलवाद्यानी लावलेल्या बॅनर ची कसनसुर – एट्टापल्ली मार्गावर होळी पेटवण्यात आली. तसेच नक्षलवाद मुर्दाबाद असे घोषणा दिल्या व नक्षलवाद्यानी पुकारलेल्या बंदचा यावेळी  विरोध केला.

चातगाव येथे नक्षल्याविरोधात निषेध मोर्चा

जिल्ह्यातील चातगाव येथील पांडुरंग पदा यांचीसुद्दा नक्षल्यांनी हत्या केली होती.त्या घटनेविरोधात चातगाव येथील गावकऱ्यांनी 25 मे रोजी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदचे निमित्त साधत पांडुरंग पदा यांच्या हत्येच्या व नक्षलवाद्यांच्या निषेधार्थ एकत्र येत नक्षलवाद्यांच्या मनमानीला कंटाळून धानोरा येथे निषेध मोर्चा काढला.यावेळी गावकऱ्यांनी धानोरा तहसीलदारांकडे मारेकरी नक्षलवाद्यांविरोधात कठोर कार्यवाही करावी यासंबधीचे निवेदन सादर केले.यावेळी १३० ते १५० गावकरी या मोर्चात सहभागी झाले होते.