पानसरेंच्या मारेकर्‍यांना अटक करा

0
8

गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेते, स्वातंत्र संग्राम सेनानी, वरिष्ठ विचारवंत लेखक, विवेकवादी व पुरोगामी वाचरसरणीचे सामाजीक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्याचे येथील भाकप व आयटकच्यावतीने २१ फेब्रुवारी रोजी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांची हत्या करणार्‍यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी भ्याड हल्ला करण्यात आला. गंभीररित्या जखमी झालेल्या गोविंद पानसरे यांचा अखेर २0 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरात मृत्यू झाला. त्यांच्या हत्त्येचा तीव्र निषेध व्यक्त करीत भारतीय कम्युनिस्ट पार्टी, ऑल इंडिया ट्रेड युनियन कौंसिल (आयटक), भारतीय महिला फेडरेशन, भारतीय शेजमजूर युनियन, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्यावतीने शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे राजलक्ष्मी चौक येथे करण्यात आले व तेथे शोकसभा घेण्यात आली. शोकसभेत पानसरेंना श्रद्धांजली अर्पित करीत त्यांची हत्या करणार्‍यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी शहर सचिव सत्यपाल उके, सी.के.ठाकरे, प्रल्हाद उके, कुक्कूडकर, चंदा इंगळे, यशोदा राऊत, राजू चव्हाण, शोभा आगडे, सविता कुशवाह, राया मारगाये, विद्या मेश्राम, महेंद्र भोयर, विनाराम मरखे, महेंद्र कटरे, रवी जेंभरे, विवेक काकडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.