मोफत तपासणी व रक्तदान शिबिर

0
9

गोरेगाव : तालुक्यातील कवलेवाडा येथे नर्मदाबाई सुरजलाल ठाकूर यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ मोफत रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून ४00 रुग्णांची तपासणी करण्यात आली. याशिवाय रक्तदान शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले. शनिवारी (दि.२१) सकाळी ११ पासून आयोजित केलेल्या या शिबिरात परिसरातील अनेक गावातील लोकांनी सहभाग घेतला. कवलेवाडा येथे सुरजलाल ठाकूर यांच्या घरी झालेल्या या कार्यक्रमात नेत्र तज्ज्ञ डॉ.नरेश मोहरकर यांनी ५0 नेत्र रुग्णांची तपासणी केली. हृदयरोग तज्ज्ञ डॉ.नरेश हरिणखेडे यांनी ४0 जणांची ईसीजी तपासणी केली. याशिवाय गोंदियाचे दंत शल्य चिकित्सक डॉ.सचिन नाकाडे यांनीही रुग्णांची तपासणी केली. त्यांना डॉ.कैशालचंद्र हरिणखेडे, डॉ.संजीव रहांगडाले, डॉ.श्रीप्रकाश रहांगडाले, ऋषीपाल टेंभरे यांनी सहकार्य केले. यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरिय विश्‍वविद्यालयाच्या राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रेमलता दिदी व डॉ.एन.डी. किरसान यांनी मार्गदर्शन केले