सालई खुर्द नळयोजनेच्या कामात अनियमितता

0
58
◆सात वर्षांपासून गावकरी पाण्याच्या प्रतिक्षेत
◆ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष
नितीन लिल्हारे //
मोहाडी,दि.29: तालुक्यातील सालई खुर्द येथील पाणी टंचाई निवारणार्थ आराखड्यात समाविष्ट करून नळ योजना विशेष दुरुस्तीच्या नावाने तांत्रिक मान्यता देत  कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पूरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा या विभागाअंतर्गत ११०४६४२/- लाख रुपयांची नळ योजनेच्या कामाला मंजुरी दिली.मात्र या कामात अनियमितता असल्यानेच गावातील नागरिकांना गेल्या सात वर्षापासून पाण्यासा
या कामाचे पाईपलाईन खोदकाम आणि पॅकिंग करण्यात अनियमितता असून अंदाजपत्रकाच्या विपरीत काम होत आहे. या कामाचा तपास पूर्ण होईपर्यंत काम थांबविण्यात यावे, अशी मागणी सालई खुर्द येथील नागरिकांनी केली आहे.
नळयोजनाचे काम सुरू करण्याच्या पूर्वी सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. पदाधिकारी, जि. प. सदस्य, प.स. सदस्य, प्रतिनिधी व इतर पदाधिकाऱ्याला माहिती नकळविता आपल्या मनमर्जीने काम सुरु करण्यात आले. मनमर्जीने काम करत असल्याने पाईप लाईन चे काम कुठं पर्यत शक्य होणार ? हे कळत नाही.  सन २००९-१० मध्ये जल स्वराज्य प्रकल्प योजने अंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाणी पूरवठा योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र या योजनेचा जलकुंभ तीन किमी अंतरावर असून, नियमितपणे पाईप लाईनमध्ये बिघाड येत असल्याने नळ योजना कधी बंद तर कधी सुरू राहत होती. यावर्षी उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा योजना म्हणून ग्रामीण पाणी पूरवठा उपविभाग तुमसर या विभागाअंतर्गत १ लाख ९४ हजार रुपयाची तरतूद करून दुरुस्तीच्या नावावर पैसा खर्च करून लाठण्याचा प्रकार दिसून आला होता. तरी लाखो रुपये खर्च करूनही पाणी पुरवठा योजना सुरू झाली नाही. आतापर्यत किती सरपंच आले आणि गेले सर्वांनी पुढाकार घेऊन पाणी पुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न केला मात्र पास होऊ शकले नाही. यावर्षी पुन्हा दुरुस्तीच्या नावावर  कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पूरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा या विभागअंतर्गत ११०४६४२/- लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली असून या कामात अनियमितता दिसून येत आहे. सालई खुर्द हे ४५० कुटुंबांचे गाव असून एकूण लोकसंख्या दोन हजार ४०० च्या जवळपास आहे. गावात पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे. सात वर्षांपासून गावकरी नळ योजनेचे पाण्या पासून कोसो दूर आहे. पाण्याच्या सोयीकरिता नळ योजनेचे काम भंडारा येथील नितीन निर्वाण नामक कंत्राटदाराला असल्याचे दिवांजी व अधिकारी यांनी सांगितले असून त्याने नवीन पाईप लाईन तयार करताना अनियमितता आणि हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. राजू सव्वालाखे, प्रवीण लिल्हारे व गावातील वरिष्ठ नागरिकांनी सांगितले की, पाईप लाईन ही तात्पुरती नसून दिर्घकालीन आहे. त्यामुळे पाईप लाईन घालताना काळजी घेण्याची गरज आहे. मात्र कसलीही काळजी घेतली जात नाही. पाईप लाईन घालताना कमीतकमी ३ फुटाची खोली असणे गरजेचे आहे. त्यातील माती काढून रेती घालून, नंतर पाईप घालावे लागते. परंतु कंत्राटदाराने असे काहीही केले नाही. जेसीबीने माती खोदून त्याठिकाणी पाईप घातले व जेसीबीच्याच सहय्यायाने पाईप बुजवण्यात आले आहेत. पाईप लाईन बुजवते वेळी त्या पाईप वर मोठ मोठे दगड पडत असल्याचे दिसून आले. भविष्यात ही पाईप लाईन संकटात येईल, पाईप लाईन टाकते वेळी खाल उंच भरारी घेऊन टाकण्यात येत आहे, नागठाना विहिरीपासून तर गावाजवळ पर्यत अशीच स्थिती असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पाईप लाईनचे खोदकाम सुरू असताना दीड ते दोन फूट खोली दिसून आल्यावर नागरिकांनी खोदकाम थांबविण्याची सूचना जेसीबी चालकांना दिली. मात्र काम थांबविण्यात आले नाही.
पाईप लाईन फिटिंगचे काम दोनशे रुपये मजूर वर्गाकडून  करत असल्याने हि पाणी पुरवठा योजना भविष्यात खंडित झाल्याशिवाय राहणार नाही ? अशी भीती नागरिकांना वाटत आहे. यात आर राठोड  कनिष्ट अभियंता पाणी पुरवठा विभाग तुमसर, कंत्राटदार नितीन निर्वाण, ग्रामसेवक, ग्रा. प. पदाधिकारी यांची साठगाठ असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
 पि.व्ही. सी.पाईप निकृष्ठ दर्जाचे वापरले जात असून, खोदकामात अनियमितता, पाईप घालताना कसलीही काळजी न घेणे अशा अनेक चुका केल्या जात आहेत. याबाबत विचारल्यावर अधिकारी कंत्राटदार बेजबाबदारपणाचे उत्तरे देतात. सदर पाणी पुरवठा योजनेच्या कामात मनमानी चालत असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग तुमसर काना मात्र करित असल्याने, जिल्हाधिकारी भंडारा व  कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा हे कोणते पाऊल उचलतात याकडे गावकऱ्यांचे विषेश लक्ष वेधले आहे.