गोंदियाच्या प्रथम महिला जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे

0
43

गोंदिया,दि.30 : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान सोमवारी (दि.२८) ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये मोठा बिघाड झाल्याने गोंधळ उडाला.त्यातच निवडणुक काळात बँका सुरु ठेऊन शेतकयाना बोनस व इतर मदतीचे पैसे वाटप करण्यासाठी पत्र दिल्याने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे वादग्रस्त ठरले होते.त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदलीचे आदेश मंगळवारी (दि.२९) सामान्य प्रशासन विभागाने काढले.त्यांच्या जागेवर नागपूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कांबदरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती बलकवडे यांनी मंगळवारी (दि.२९) पदभार घेतला.त्या गोंदियाच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या.तसेच नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविला. श्रीमती बलकवडे या डॅशींग अधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेत ओळखल्या जात होत्या.त्यांच्यावर राजकीय नेत्यांचा कुठलाच प्रभाव काम करीत नसल्याची चर्चा आहे.एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहतात.सोबतच कर्मचार्यांना कार्यालयीन वेळेचे बंधन व कामकाजाबद्दल सजग राहावे अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी एवढी स्पष्ट भूमिका बलकवडे यांची असल्याचे बोलले जात असून राजकीय दबाव घालून काम करण्याचा प्रयत्न करणार्यांना त्या बाजूला सारत नियमाप्रमाणे व सामंज्यसांने जे होईल तेच काम करण्यावर त्यांचा भर असून मुख्यमंत्री यांच्या जवळच्या गटातील अधिकारी म्हणून त्या ओळखला जात आहेत.त्यांचे पती हे नागपूर पोलीस विभागात अधिकारी आहेत.