25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता चार महिन्यांपासून फरार आरोपीस अटक

चार महिन्यांपासून फरार आरोपीस अटक

0
30

आर्वी,दि.30ः-दरोडा टाकुन फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी ठाणेदार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कसून शोध घेत छत्तीसगड राज्यातील जामूल येथून मोठय़ा शिताफीने अटक केली. त्यांच्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. अंकुश वसंतराव तिजारे असे आरोपीचे नाव असून तो अमरावती जिल्ह्य़ाच्या कुर्‍हा येथील रहिवासी आहे. २८ जानेवारीचे रात्री ९ वाजताचे सुमारास आपल्या चार साथीदारासह साईनगर येथील गोपाल किराणा दुकानाचे मालक रावलानी यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांच्या जवळची रूपयाने भरलेली बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला होता. यातील आरोपी नागपूर येथील रवीरतन बोरकर, विशाल मानेकर, प्रज्वलीन मेर्शाम व आर्वी येथील राजेश महल्ले यांना पोलिसांनी लगेच अटक केली होती.परंतु, अंकुश तिरमारे चार महिन्यांपासून फरार होता. पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले, प्रवीण जुवारे, विशाल मडावी, भूषण निघोट यांच्या शोध पथकाने ही कारवाई केली.