नकटीच्या सरपंचपदी राऊत तर पळसगाव येथे बागडेहरिया विजयी

0
11
देवरी,दि.4- नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीत नकटी ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी हेमलता राऊत तर पळसगाव धमदीटोलाच्या सरपंचपदी फुलवंता बागडेहरिया या निवडून आल्या आहेत. दरम्यान, कॉंग्रेसच्या वतीने दोन्ही सरपंचाचा सत्कार करण्यात आला आहे.
सविस्तर असे की देवरी तालुक्यातील नकटी आणि पळसगाव धमदीटोला या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी गेल्या 27 तारखेला मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीची मतगणना तहसील कार्यालयात आज करण्यात आली. यामध्ये नकटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हेमलता राऊत यांचा 134 मतांनी विजय झाला. पळसगाव धमदीटोला येथे फुलवंता उमेश बागडेहरीया ह्या 180 मतांनी विजयी झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी विजय बोरूडे यांनी जाहिर केले.
 हे दोन्ही नवनियुक्त सरपंच कॉंग्रेस समस्थित  पॅनलचे असून या विजयी उमेदवारांचा सत्कार कोरेटी भवनात करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहेसराम कोरेटी हे होते. यावेळी संदीप भाटिया, वसंत पुराम, अविनाश टेंभरे, नरेश शहारे, सोनू साहू, मोहन कुंभरे कुलदीप गुप्ता, कमलेश पालीवार, घनश्याम फरकुंडे, सोनू नेताम, उमेश बागडेहरिया आदी मान्यवर उपस्थित होते.