24.8 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ काळे जालन्याचे तर गोयल भंडारा जिल्हाधिकारी

काळे जालन्याचे तर गोयल भंडारा जिल्हाधिकारी

0
46

गोंदिया,दि.05ः- महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज वरिष्ठ प्रशासनिक अधिकार्यांच्या बदल्या केल्या.त्यामध्ये निवडणुक काळात गोंदिया जिल्हाधिकारी पदावरून हटविण्यात आलेले अभिमन्यू काळे यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना हा मतदारसंघ आहे.तर रजेवर असलेले भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची सुध्दा बदली करण्यात आली असून त्यांना नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठविण्यात आले.तर नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांची बदली भंडारा जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम.सुर्यवंशी यांची बदली ठाणे अप्पर आदिवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.त्यांच्या जागेवर एमएआयडीसीचे कार्यकारी संचालक ए.न.कारंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

blank