माजी खासदार पटोलेंच्या वाढदिवस कार्यक्रमात नवनिर्वाचित खा.कुकडेंचा सुकळीत सत्कार

0
11
साकोली,दि.६ :- तालुक्यातील सुकळी येथे आयोजित बापू स्व. फाल्गुनरावजी पटोले स्मृतीनिमित्ताने श्रीमद भागवत कथा,जागतिक पर्यावरण दिन व माजी खा.नानाभाऊ पटोले यांच्या जन्मदिन कार्यक्रमाचे औचित्य साधून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांचा सत्कार खासदार प्रफुल पटेल व माजी खा.नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला खा.प्रफुल पटेल,नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे,माजी आमदार बंडुभाऊ सावरबांधे,अविनाश वाजूरकर,काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे,रामरत्तन राऊत,भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे,भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष सुनील फुंडे,माजी आमदार आनंदराव वंजारी,पी.जी.कटरे,धनजंय दलाल,राजेश नंदागवळी,देवानंद पवार,प्रमोद लांजेवार,होमराज कापगते,अशोक चांडक,राजू पालीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाला परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.भागवत कथेच्या समारोपानंतर सर्वांना प्रसादाचे वितरण करण्यात आले तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.