एसटी कर्मचार्यांचा संप,तिरोडा डेपो पुर्णंत बंद,गोंदियात अल्प प्रतिसाद

0
3

गोंदिया,दि. ९ : गोंदियात संपाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. ८) सारे सुरळीत असताना शनिवारी गोंदिया आगारातील एसटीच्या कर्मचाèयांनी संपाची हाक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी अचंबित झाले. दररोज खेड्यापाड्यातून येणारा भाजीपाला, दूध अशा दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शहराला झाला नाही. त्यामुळे शहरवासींची दैनंदिनी पार विस्कटली. जिल्ह्यातील तिरोडा बस आगारातून एकही बस न सुटल्यााने प्रवाशांना चागंलाच त्रास सहन करावा लागला.
वेतनवाढ या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकरिता गुरुवारच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाèयांनी संप पुकारला आहे. तिरोडा वगळता गोंदिया आगारातील कर्मचारी शुक्रवारी या संपात सहभागी झाले नाही. शनिवारी मात्र, सकाळपासून गोंदिया आगारातील कर्मचाèयांनी या संपात उडी घेतली. नागपूर, बालाघाट, तुमसरच्या दिशेने धावणाèया ३०२ फेèया सकाळपासूनच बंद करण्यात आल्यात. एसटी चालक-वाहकांपासून ते अन्य असे एकूण ३१९ कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे प्रवाशांची  पंचाईत झाली. दिव्यांग, वयोवृद्धांना याचा जबर फटका बसला. सायंकाळी उशिरापर्यंत बसेस सुरू होतील, या आशेने ते वाट पाहात होते. परंतु, बसेस सुरू न झाल्याने तिकिटाचे दुप्पट पैसे मोजून त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. अनेकांनी घराची वाट धरली तर, काहींना निर्धारित ठिकाणी जाणे आवश्यकच असल्याने त्यांनी काळीपिवळी, खासगी बसेस, ऑटोने प्रवास केला. संपामुळे खासगी वाहनचालकांची चांगलीच चांदी झाली. दुप्पट तिकीट दर आकारले जात होते. संपामुळे एका दिवशी ४ लाख रुपयांचा तोटा आगाराला सहन करावा लागला.उल्लेखनीय म्हणजे, सकाळी तालुक्यातील शेतकरी भाजीपाला तसेच दूध उत्पादक दूध घेऊन शहरात येतात. शनिवारी हे साहित्य शहरात पोहोचलेच नाहीत. त्यामुळे शहरवासींची दैनंदिनी बिघडली. याचा फटका शहरवासींनादेखील बसला.