राष्ट्रवादीचा वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात

0
10

गोंदिया,दि.१२- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन सोहळा येथील रेलटोली स्थित कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन साजरा करण्यात आला.त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सड़क अर्जुनी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्यावतीने कोहमारा येथे ध्वजारोहण करुण वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार राजेन्द्र जैन,प्रदेश प्रतिनिधी मनोहर चन्द्रिकापुरे,जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर,जि.प.सदस्य रमेश चुरहे,तालुका राँका अध्यक्ष डॉ अविनाश काशिवार,नगराध्यक्ष देवचंद तरोने,माजी जि.प.उपाध्यक्ष छाया चौहान, गजानन परशुरामकर, प्रभुदयाल लोहिया, शिवाजी गहाने, नरेश भेंडारकर, सुधाकर पंधरे सह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी गावात पथसंचालन करण्यात आले.तिरोडा येथे माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष डॉ.प्रेम रहागंडाले,वाय.टी.कटरे,मनोज डोंगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.