बाबासाहेबांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न- ना. बडोले

0
11

अर्जुनी मोरगाव,दि.दि.१२: बुद्धाचा धम्म हा आचरणचा धम्म आहे. आपले चित्त शुद्ध होणे गरजेचे आहे. महापुरूषांच्या विचारांनेच आपली प्रगती आहे. बुद्ध धम्म पुढे नेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. राज्याचा सामाजिक न्याय मंत्री म्हणून मला जी जबाबदारी मिळाली त्या संधीचे सोने करण्याचा मी प्रयत्न केला. धम्माचे अनेक कार्य पुढे नेण्याचा आपण प्रयत्न केल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी केले.
ते अर्जुनी मोर तालुक्यातील अरततोंडी (दाभणा) येथे बुद्धविहाराचे लोकार्पण व भगवान बुद्ध तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाच्या अनावरण प्रसंगी १0 जून रोजी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काॅग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य किशोर तरोणे, मार्गदर्शक म्हणून मराठो सेवा संघाचे केदार नाकाडे, सभापति अरविंद शिवणकर, लायकराम भेंडारकर, नामदेव कापगते, सरपंच मिनाक्षी तरोणे, डॉ. गजानन डोंगरवार, सुनिता हुमे, रघुनाथ लांजेवार, छगन पातोडे, खुशाल काशीवार, भोजराम रहेले, .चैतराम शिवणकर, आशा मुनेश्‍वर, सरिता पातोडे, गीता ब्राम्हणकर, भिमाशंकर मुनेश्‍वर, सत्यजीतराव तरोणे, रामचंद्र रहेले, संतोष खोटेले, लिलाधर मुनेश्‍वर, वनरक्षक भुरे आदी उपस्थित होते.  बौद्ध विहाराचे उद््घाटन तथा भगवान बुद्घ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाचे अनावरण ना. बडोले यांनी केले. यावेळी भंते आसंग यांनी बुद्ध पूजा-पाठ व त्रीशरण पंचशिल म्हटले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून मूर्तिदान दाते गोवर्धन ठवरे यांचा ना. बडोले यांचे हस्ते शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले की डॉ. बाबासाहे आंबेडकरांनी सनातन रूढी परंपरेला बाजूला करून समता न्याय व बंधुता निर्माण करण्याचे काम केले. डॉ. बाबासाहेबांना देव म्हणून पूजू वये तर त्या महामानवाच्या विचारांची पूजा होणे व त्यांच्या विचारेच आचरण करणे गरजेचे आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे केदार नाकाडे म्हणाले की शिव शक्ति व भिम शक्ति एकत्रित येवून या महापुरूषांच्या विचारांची कार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक गुलाब ठवरे यांनी केले तर संचालन किर्तीवर्धन मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोवर्धन ठवरे, संजय ठवरे, माणिक धारगावे, अनिल सुखदेवे, घनश्याम कांबळे, संदिप सुखदेवे तथा पंचशिल बौद्ध विहार अरततोंडीच्या समाज बांधवांनी सहकार्य केले.