10 वाजेच्या कर्जवाटप मेळाव्याला दुपारहोऊनही पाहुण्यांची पाठ

0
8
गोरेगाव,दि.13 : येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज 13 जून रोजी सकाळी 10 वाजता आयोजित पिक कर्ज वाटप व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या मेळाव्याच्या उदघाटनाला दुपारी 3 वाजेचा मुहूर्त मिळाल्याने सकाळपासून आलेल्या शेतकरीसह कर्मचारी व अधिकारीवर्गात नाराजीचा सूर बघावयास मिळाला.विशेष म्हणजे या पिक कर्जवाटप मेळाव्यात संख्या कमी दिसता कामा नये यासाठी पोलीस पाटील,ग्रामसेवक,तलाठी अंगणवाडी सेविकांसह आशासेविकांना सुध्दा हजर राहण्याचे निर्देश गटविकास अधिकारी यांच्यामार्फेत देण्यात आले होते.सकाळी 10 वाजेचा कार्यक्रम असल्याने गावखेड्यातील नागरिक मोठ्याने आमदार,पालकमंत्री व अधिकारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करीत होते.दुपारी 2.30 वाजेपर्यंत कुणीही या मेळाव्याच्या उदघाटनासाठी पोहचले नव्हते.विशेष म्हणजे कर्जवाटप मेळाव्यात अंगणवाडी सेविका व आशा सेविकांचे काय काम हा सुध्दा प्रश्न उपस्थित झाला असून निव्वळ गर्दी दाखविण्यासाठीच यांचा उपयोग काय अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.