दुष्काळ व तुडतुड्याच्या मदतीसाठी मोखेवासी करणार आंदोलन

0
13

साकोली,दि.१४ः- मोखे येथील शेतकèयांची नावे अद्यापही दुष्काळ व तुडतुडा मदतनिधीत न आल्याने नुकसान होऊनही मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आल्याने सदर शेतकèयांना शासनाने त्वरीत मदत द्यावी या आशयाचे निवेदन मोखे येथील शेतकèयांनी साकोली तहसिलदारांना दिले आहे.निवेदनात मोखे येथे १०० टक्के पिकाचे नुकसान झाले होते.त्यावेळी पिकाचे सर्वेक्षण करतांना मोजक्याच शेतातील पिकाचे सर्वेक्षण करुन त्यांचा पचंनामा करण्यात आला.त्यावेळी सर्वांनाच मदत मिळेल व नावे येतील असे सांगण्यात आले होते.परंतु जेव्हा मदतीची यादी प्रकाशीत झाली तेव्हा असंख्य शेतकèयांची नावेच नसल्याचे उघड झाल्याने २० जूनपर्यंत न्याय न मिळाल्यास २१ जूनपासून साकोली तहसिल कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषणास बसण्याचा इशारा शेतकèयांनी निवेदनातून दिला आहे.निवेदन देतेवेळी अनिल टेंभरे,दिनेश्वर टेंभरे,सुरजलाल रहागंडाले,केसवराव टेंभरे,थामेश्वर क्षिरसागर,राजू क्षिरसागर,एकेश्वरी टेंभरे,जिवनलाल टेंभरे,योगेश पराते,दामा पराते,ओमप्रकाश टेंभरे,तुळशीराम आंबेडारे,अशोक बारापात्रे,नोकलाल टेंभरे,मनोहर आंबाडारे,राजू निखाडे आदींनी दिला आहे.