राँका व काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन

0
8

मोहाडी ,दि.१७ -तालुक्यातील विविध रेतीघाटांवर रेतीची चोरी करण्यात येत असून रेती चोरीची सुट काही विशिष्ट व्यक्तींनाच दिली जाते. काही पक्षाच्या राजकीय प्रभावाखाली प्रशासन काम करीत असून रेती चोरीवर प्रतिबंध लावण्यात प्रशासन अपयशी असल्याचा ठपका ठेवत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोहाडी तहसीलदारांच्या वतीने मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील शेतकर्‍यांना अजून कर्जमाफी झाली नाही. केवळ १६ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, र्शावण बाळ, वृद्धापकाळ योजनेचा लाभ देताना पक्षभेद केला जातो. गॅस कनेक्शन नसताना रॉकेल दिले जात नाही. ऑनलाईन सातबारामध्ये खूप चुका झाल्या आहेत. शासन निर्णय होऊनही वर्ग २ च्या शेतजमिनी वर्ग १ मध्ये करण्यात आल्या नाहीत. आदी विषयांवर खासदार मधुकर कुकडे यांनी तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली. तसेच प्रत्येक शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना त्वरित पीककर्ज वाटप करावे, ऑनलाईन सातबाराच्या चुका दुरूस्ती करावी, सातबारावर शेतातील झाडांची नोंद करावी, वर्ग २ च्या जमिनी सरसकट वर्ग १ करण्यात याव्यात, र्शावणबाळ, वृद्धापकाळ व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना १२00 रुपये, अनुदान देण्यात यावे, गॅस कनेक्शन नसणार्‍यांना रॉकेल पुरवठा करावा, गरजू महिलांना उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात यावे, नगरपंचायत मोहाडी येथील रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना त्वरित घरकुलाच्या लाभ देण्यात यावा, अन्नसुरक्षा योजनेतील झालेल्या घोळाची चौकशी करून गरजूंनाच अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा, या मागण्यांचे निवेदन देण्यात आल.े.
राष्ट्रवादी पक्षाचे खासदार मधुकर कुकडे, माजी आ. गोविंद शेंडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वासुदेव बांते, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रभू मोहतुरे, नगराध्यक्ष गीता बोकडे, उपाध्यक्ष सुनिल गिरीपुंजे, नगर परिषद सदस्य मनिषा गायधने, रागिनी सेलोकर, किरण अतकरी, गजानन झंझाड, खुशाल कोसरे, प्रदिप वाडीभस्मे, भास्कर कढव, झगडू बुधे, पुरूषोत्तम पातरे, रफिक सैय्यद, जितेंद्र सोनकुसरे, सुर्यभान बावणे, मनिषा मडामे, शारदा फुले, सुनिता सोरते, कविता बावणे, विजय पारधी, वर्षा बारई, फिरोज शेख, किशोर पात्रे, राजू उपकरकर शंकर शेंडे, कैलास तितिरमारे, देवेंद्र ईलमे, राजेश बाभरे, कैलास मते, वामन बोकडे, ज्ञानेश्‍वर आगाशे, श्याम कांबहे, सोनू मेहर, गुड्डू बांते, राजू टिकापाचे, चंद्रशेखर चवळे, गीता साखरकर, महेंद्र बावणे, हितेश साठवणे, मनोहर बुरडे, बंडू धारगावे, लिलाधर धार्मिक आदी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.