पांडेचेरीत पार पडली भारतीय खेतमजूर युनियनच्या राष्ट्रीय कौंसिलची सभा

0
8

गोंदिया,दि.१७ -भारतीय खेतमजूर युनियन या देशातील पहिल्या संघटनेच्या राष्ट्रीय जनलर कौंसिलची सभा ८ ते १0 जून दरम्यान युथ हॉस्टेल पांडेचेरी येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष केरळचे माजी खासदार कॉ. के. ई. इस्माईल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेला राज्यातील संघटनेचे सचिव कॉ. शिवकुमार गणवीर, राज्य अध्यक्ष औरंगबादचे अँड. मनोहर टाकसाल, बीडचे कॉ. नमदेव चव्हाण, गोंदियाचे कॉ. हौसलाल रहांगडाले, जळगावचे कॉ. अमृत महाजन उपस्थित होते. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव माजी खा. नागेंद्रनाथ ओझा यांनी कार्यवृत्तांत सादर केला. यावर प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधींनी मत प्रदश्रीत केले. कॉ. शिवकुमार गणवीर यांनी राज्यातील राकीय परिस्थिती भीमा- कोरेगाव येथील दंगल, २९ एप्रिलच्या भारतबंदची राज्यातील स्थिती, नुकतीच नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोपाखाली आंबेडकरी चळवळीच्या पाच कार्यकर्त्यांना झालेली अटक, राज्यात संघटनेतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाचे सविस्तर विवेचन केले. यावेळी शेतजुरांच्या अतिक्रमण जमिनीचे व घरांचे पट्टे, रोजगार हमी कायद्याचीअंमलबजावणी, ५00 रुपये दैनिक मजुरी, घरकुल, पेंशन, राशन, दलित, आदिवासींवरील अत्याचार आदीं विविध मागण्यांकरिता ९ ते ११ ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशात देशव्यापी सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्णय, ३ ते ५ डिसेंबरपर्यंत तिरुपती आंध्रप्रदेश येथे संघटनेचे १४ वे रौप्यमहोत्सवी राष्ट्रीय अधिवेशन घेणे, तत्पूर्वी जिल्हा व तालुका अधिवेशन घेणे आदी ठराव पारित करण्यात आले. बैठकीला देशाच्या विविध राज्यातील प्रतिनिधी तेलंगणाचे कॉ. जी मलेश, पंजाबचे गुलाबसिंह गौरिया, हरियाणाचे दरियाव सिंह, केरळचे के. राजेंद्रन, तामिलनाडूचे पेरियार स्वामी आदी उपस्थित होते. पुड्डचेरीचे राज्य अध्यक्ष कॉ. रामास्वामी यांनी उपस्थितांचे आभार मानले.