गुणवंत विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक पुस्तिका देऊन सत्कार, जिल्हा शिवसेनेचा ऊपक्रम

0
17
गोंदिया,दि.16 : गोंदिया जिल्हा  शिवसेनेच्या वतीने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १० वी व १२ वीच्या परिक्षेत गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॅरियर मार्गदर्शक पुस्तिका व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष युवासेनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव निलेश हेलांडे पाटील म्हणाले की,सध्याचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे.अशावेळी आपल्या भविष्याची दिशा ठरवितांना लक्ष्य निर्धारित करुन घेणे महत्वाचे आहे.सध्या देशात डाॅक्टर,अभियंत्यांची मोठी फळी निर्माण झाली आहे.त्या तुलनेत रोजगाराचे साधन नाहीत.त्यामुळे आपण सर्वांनी अशा क्षेत्राकडे आपले लक्ष्य केंद्रीत करणे आवश्यक आहे की त्या माध्यमातून आपले भविष्य घडू शकेल.आपल्या देशात अनेक अअसे विषय आहेत की ज्यामध्ये आपण आपले करियर घडवू शकतो.त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.आईवडीलांच्या दबावात मुले डाॅक्टर अभियंते होण्यासाठी अभ्यास करतात परंतु त्यांना काय व्हायचे हे पालक कधीच समजून घेत नाही.त्यामुळेच युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोंदियातील युवकांना नव्या कॅरीयरची माहिती व्हावी यासाठी जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी आयोजित केलेल्या या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेत नव्या क्षेत्रात करीयर घडविण्याचे आवाहन केले.राजेश व्यास यांनी आज आपण डाॅक्टर अभियंत्याच्या मागे लागल्यामूळे चांगले कुणीही इंग्रजी वा़डमयाकडे जात नसल्याने शाळा महाविद्यालयात चांगले इंग्रजीचे प्राध्यापक व शिक्षक मिळेनासे झालेले आहेत.त्यामुळे इंग्रजी वाडंमय,मराठी वाडमय सह वाणिज्यशाखेत आपण कला शाखेत शिक्षण घेतल्यानंतरही करियर घडवू शकता असे मार्गदर्शन केले.
शिक्षण घेत असतांना अनेक विद्यार्थ्यांना १०वी व १२ वी नंतरच्या  कॅरियरची निवड कशी करावी हे कळत नाही. योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक चांगले विद्यार्थी संधी पासून वंंचित राहतात. त्या दृष्टीकोणातून मार्गदर्शक कॅरियर मेळाव्याचे आयोजन शिवसेनेच्या वतीने स्थानिक अग्रेसन भवन येथे करण्यात आले होते.मंचावर  शिवसेना जिलाप्रमुख विंध मुकेश शिवहरे, कार्यक्रमाचे उदघाटक राजेश व्यास, प्रा. अरूणकुमार मित्रा, ड्रीम्स आईआईटी सेंटरचे अजय मेंढेर, कॅरीयर झोनचे लक्ष्मीकांत बावनथडे, सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, शिवसेना उपजिलाप्रमुख तेजराम मोरघडे, सोहन क्षीरसागर, सुनील लांजेवार, शिक्षक आघाडीचे प्रमोद सोनवाने, बापी लांजेवार, तालुका प्रमुख अमरसिंग, शहरप्रमुख संजू शमसेरे, हर्षल पवार, मनिष गौतम,आशु मक्कड़, आशु महाराज यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व मार्गदर्शक उपस्थित होते.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विधानसभा क्षेत्रातील जवळपास  प्रत्येक शाळेतून  गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन सुनिल लांजेवार व हर्षल पवार यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.