महागाईविरोधात भाकपाचे धरणे आंदोलन

0
9

गोंदिया,दि.22ः-वाढती महागाई, बेरोजगारी व शेतकरी आत्महत्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने २0 जून रोजी महागाई विरोधी दिन पाळण्यात आला. याअंतर्गत भाकपा जिल्हा शाखेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. पेटड्ढोल डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत झालेली वाढ रोखण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याकरीता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर बुधवारी २0 मोर्चा काढध्यात आला. दरम्याण मोर्चेकरूच्या शिष्टमंडळांने तहसीलदारामार्फत मुख्यमत्रयांना मागण्याचे निवेदन पाठविले अच्छे दिन असे स्वप्न दाखवून मोदी सरकार सतेत आले या सरकारने प्रत्येक वर्षी रोजगार प्रदान करण्याचे आश्‍वासन दिले होत परंतू हे आश्‍वासन हवेत विरले नोटाबदी करून ९0 लाख रोजगार नष्ठ केले सरकारी विभागात अनेक पदे रिक्त असताना ती पदे भरण्यात आली नाही महागाईने तर उच्चाकं गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ,शेतकरी शेतमजूर यांनर आर्थीक टचाईला समोरे जावे लागत आहे. पेटड्ढोल डिझेल व गॅस सिलिडरच्या किमतीत अलीकडे मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक टंचाईला सामना करावा लागत आहे. सरकारने ही दरवाढ थांबवून महागाई दर कमी करावा रोजगारनिर्मिती करावी ,अशी मागणी मोर्चे करूंनी केली मोचोर्चे नेतुत्व हौसलाल रहागडाले यांनी केले नायब तहसीलदार जी आर नागपूरे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले निवेदलन देताना चरणदास भावे,परेश दुर्गवार यांच्यासह कार्येकर्ते मोठ्या सख्येने सहभागी झाले .