शेतकरी सन्मान योजनेत ‘वनटाईम सेटलमेंट’ योजना

0
20

गोंदिया,दि.0८ः-शासनाने २८ जून २0१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२0१७ जाहीर केली व योजनेच्या व्याप्तीमध्ये ९ मे २0१८ च्या शासन निर्णयानुसार वाढ करण्यात आली असून या योजनेत १ एप्रिल २00१ ते ३१ मार्च २00९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतु सन २00८ व सन २00९ च्या कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकर्?यांचा आणि १ एप्रिल ते ३१ मार्च २0१६ या कालावधीत वाटप केलेले पीक कर्ज तसेच इमू पालन, पॉली हाऊस व शेडनेट यासारख्या मध्यम मुदती कर्ज प्रकाराचाही समावेश या योजनेत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुद्दल व व्याजासह १.५ लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांसाठी एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांनी त्यांच्या हिश्याची रक्कम भरण्याची मुदत ३0 सप्टेंबर २0१८ पयर्ंत वाढविण्यात आलेली आहे. तरी शेतकर्‍यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेत ३0 जून २0१६ अखेर थकीत तथा रुपांतरीत कर्ज बाकी असलेल्या व सन २0१५-१६ व सन २0१६-१७ मध्ये कर्ज घेवून नियमीत परतफेड करणारा सभासद प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास पात्र आहे. जिल्ह्यात सर्व बँकांमिळून या कर्जमाफी योजनेअंतर्गत ६४१६७ खातेदारांना कर्जमाफी अंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे. लाभ देण्यात आलेल्या शेतकर्‍यांनी नविन कर्ज मिळण्याकरीता संबंधित बँकेच्या शाखेमध्ये संपर्क साधावा.
पात्र शेतकर्‍यांना कर्ज वाटपामध्ये अडचणी येत असल्यास त्यांनी तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा उपनिबंधक सकारी संस्था गोंदिया कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांनी केले आहे.