कांद्री वनअधिकाऱ्यांना निलंबित करा

0
10

मोहाडी,दि.12: कांद्री वनपरिक्षेत्रातील टाकला व सालई (बु.) येथील रोपवनाच्या कामात मजुरांच्या मजूरीत अनियमितता आढळली. अनियमिततेला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी भरून त्यांना निलंबित करण्याची मागणी राकां-काँगेस पदाधिकाऱ्यांनी भंडारा येथील उपवनसंरक्षकांकडे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, कांद्री वनपरिक्षेत्रात टाकला व सालई (खुर्द) येथे प्रत्येकी १५ हेक्टर असे एकूण ३० हेक्टर मध्ये रोपवनाच्या कामावरील मजुरांच्या मजुरीमध्ये अनियमितता झाली आहे. मजूरांना २०-३३ पैसे प्रती खड्डयाच्या दराने पैसे मिळणार असे मजूरांना सांगण्यात आले होते. मजूरांना हुंडयात (पध्दतीने) कामे देण्यात आली होती. प्रत्येक मजूर दर दिवशी १८ खड्डे खोदकाम करीत होता. त्याचे सुमारे ३६० रुपये प्रत्येक दिवसामागे पडत होते.ह्या मजूरांना १३ रुपये, १४ रुपये प्रति खड्डा या दराने देण्यात आले. प्रत्येक मजूरांनी दीड बाय दीड आकाराचे खड्डे खोदकाम केले होते. सदर दोन्ही कामे ३० हेक्टरमध्ये असून ३३३३० खड्डे खोदकाम करण्यात आले.
येथे अतिरिक्त मजूरांच्या नावाने बोगस खड्डे दाखवून व कधी न कामावर न जाणारे लोकांचे सुध्दा नावावर पैसे दाखवून पैशांची अफरातफर करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाई करुन निलंबित करण्याची मागणी काँग्रेस- राकां शिष्टमंडळाने केी आहे. शिष्टमंडळात डॉ. पंकज कारेमोरे, प्रा. कमलाकर निखाडे, राकेश धार्मिक, प्रमोद सिंदपूरे, प्रविण थोटे उपस्थित होते.