मौदा परिसरातील शेतकर्यानी दूध फेकले रस्त्यावर

0
6

मौदा,दि.16(प्रा.शैलेश रोशनखेडे)ः- दूधाचे दर वाढविण्याच्या मागणीला घेऊन सरकारच्या विरोधात शिवशंकराच्या पिंडीवर दुधाभिषेक करुन तसेच मुंड़न व सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शेतकर्यांनीं आंदोलन केले.मौदा तालुक्यातील तारसा जॉइंड येथे हे आंदोलन करण्यात आले.स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते संजय सत्यकर,उपसरपंच गजानन डांगरे व दूध उत्पादक शेतकयांनी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शेने केली तसेच रस्ता रोखो आंदोलन केले. दूधाची दर वाढ व्हावी.शेतकर्यांना लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. दूध घेणाऱ्या कंपनी दूध विकण्याचे दर वाढवित आहेत.पण जो दुग्ध  व्यवसाय करून खरी मेहनत घेतो त्यांचे दर कधी वाढणार  असा प्रश्न शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला विचारत आहेत.