रेल्वेगाड्या आऊटवर थांबविणे बंद करा-मनसेचे निवेदन

0
16

गोंदिया,दि.20ः-  गोंदिया ते इतवारी गाडी क्रमांक ६८७४३ आणि इतवारी ते गोंदिया  गाडी क्रमांक ६८७४४ मधे दैनंदिन नोकरदार वर्ग ये – जा करीत असतो. गेल्या काही दिवसांपासून वरील गाड्या आपल्या निर्धारित वेळेत धावत नसून त्यांना आऊटरला थांबविले जात असल्याने दैनंदिन नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या वर्गाला गैरसोय होत आहे. खासगी व शासकीय कार्यालयात त्यांना लेटमार्कचा सामना करावा लागत असल्याने या गाड्यांना आऊटरला न थांबविता वेळेत सोडण्याची मागणी वजा तक्रार दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष उदय पोफळी यांच्याकडे केली होती.त्यानुषंगाने दैनंदिन रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष उदय पोफळी यांनी रेल्वे स्टेशन मास्टर यांना निवेदन दिले.तसेच लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले.यावेळी मनसे शहर अध्यक्ष उदय पोफळी , दैनंदिन प्रवासी उमेश सोनवाने, देवेंद्र पिपरेवार, संगीता थोटे, एस. टी. मलेवार आणि अन्य उपस्थित होते.