नागपुर -कामठी मार्गवर प्लास्टीक कारखान्यात भीषण आग

0
9
कामठी/मौदा(प्रा.शैलेश रोशनखेडे,दि,20: नागपूर कामठी मार्ग वर  नाका नंबर 2 जवळ आज गरूवारी  सकाळी 8 .30 च्या सुमरात कृषी मित्र प्लस्टिक पाईप नामक कंपनी ला आग लागल्याने लाखों रूपयांचे माल जळून खाक झाले परंतु सुदैवाने या तांडवात कोणतीही जीवहानी झाली नाही.
       प्राप्त माहितिनुसार  नागपुर- कामठी रोड वर  खसाळा ग्रामपंचायत अंतर्गत ड्डीगोदाम निवासी जुनैद सिद्दीकी यांचा प्लास्टी पाईप तैयार करण्याचा कारखाना आहे.कारखान्यात तैयार होणारे पाईपांचा शेती मधे वापर होतो.गुरूवारी सकाळी कारखान्यातुन धूर निघतांनी लोकांना दिसले.त्यानी लगेच मालकाला कळविले.पण पाहता पाहता आग ने भीषण रूप धारण केले, लगेच गावतील लोकांनी अग्निशमन विभागाला आग लग्गल्याची माहिती दिली.नागपूर विभागातील अग्निशमन च्या 6 गाड्या घटनास्थळी पोहचून चार तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली .परंतु सुदैवाने यात काही जिवंत हानी झाली नसून मात्र लाखोंचे प्लस्टिक पाईक जडून खाक झाले आहे .आग लागल्याचे कारण प्राथमिक स्वरूपात
शॉट सर्किट मुळे लागल्याचे अंदाजा व्यक्त कर्णायत येत आहे.परंतु संध्याकाळ पर्यंत कारखान्यातुन धूर निघत होते.ह्या घटने मुळे नजीकच्या परिरात आता धोक्याचे वातावरण पसरले आहे.कारण ह्या ठिकाणी अनेक टाईल्स व छोटे मोटे कारखाने सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच यशोधरा पोलिस पाचरण करून पंचनामा करण्यात आला.घटनेची चौकशी सुरू आहे