रेशनदुकानदाराच्या भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांचे आंदोलन

0
11

मौदा(प्रा.शैलेष रोशनखेडे),दि.21ः- स्वस्त धान्य दुकानदार धान्य खुल्या बाजारात विकुन काळा बाजार करतात व जनतेला शासनाकडून मिळणाऱ्या सुविधेपासून वंचित ठेवत असल्याने सदर भ्रष्टाचारी रेशन दुकानदारावर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन तालुक्यातील धानला येथील नागरिकांनी आंदोलन सुरु केले आहे.धानला ग्रामस्थानुसार अनेक बोगस शिधापत्रिका आढळून आल्या असून नोव्हेबंर 2008 पासून शालेय विद्यार्थ्यांच्या नावे येत असलेल्या धान्याची उचल केली गेली.मात्र शाळेला पुरविले नाही. में 2009 मध्ये bpl लाभार्थयाचे धान्य उचल केले, मात्र शिधाप्रत्रिका धारकाना दिले नाही.या सर्व प्रकरणाची तक्रार करण्यात आल्यानंतर त्या चौकशीसाठी तपासणी अधिकांरी आले. तपासणी अधिकारी जेव्हा दुकानाची तपासणी करण्यारीता आले तेव्हा दुकानदाराने दुकान उघड़ण्यास नकार दिल्याने तलाठी व नागरिकांच्या समक्ष पंचनामा करून दुकान उघडण्यात आले. तेव्हा दुकानाचे मागील दार उघड़े होते, शिल्लक साठा व रजिस्टरवरील साठ्यामधे तफावत दिसून आली.या सर्व प्रकरणावरुन ग्रामसभेत रेशन दुकानाचा परवाना रदद् करण्याचा ठराव पारित करण्यात आला.ग्राम सभेच्या निर्णयानंतरही एन.एन.मेश्राम यांना धान्य वितरण अधिकांरी सहकार्य करुन  गावकर्यांच्या भावनेशी खेळत असल्याने  प्रशासन व रेशन दुकानदाराच्या विरोधात सुभाष सार्वे व अन्य गावकर्यानी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.