स्वतंत्र विदर्भासाठी ९ ऑगस्टला आंदोलन

0
14

नागपूर,दि.23ः-विदर्भ राज्य आंदोलन समितीची विदर्भस्तरीय राज्य कार्यकारिणीची बैठक २२ जुलै २0१८ ला नागपूर येथील आमदार निवासाच्या कॅन्टींग मध्ये पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार किसन गवळी हे होते. बैठकीत विदर्भातून सदस्यसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत बेरोजगारी, महाराष्ट्रातील आर्थिक राजकीय परिस्थिती, २0१९ च्या होणार्‍या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका, संघटनात्मक बांधणी, आंदोलनात विदर्भातील तरुणांना सहभाग वाढविणे, महिला संघटन मजबूत करणे आदी विषयावर सांगोपांग चर्चा झाली.
गेल्या ५ वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी अनेक रस्त्यावरील आंदोलन केली. बुलडाणा पासून ते गडचिरोली पर्यंत १00 तालुक्यांचा समावेश आहे. परंतु भाजप सरकारने विदर्भातील जनतेच्या आंदोलनाला गांभीर्याने घेतले नाही. आमची सत्ता केंद्रात आली तर विदर्भ राज्य देणारच असे ठोक आश्‍वासन देऊन सुद्धा गेल्या निवडणुकात विदर्भाच्या प्रश्नावर लढून सुद्धा भाजपाने स्वत: दिलेले आश्‍वासन पाळले नाही. विदर्भाचा विकास करू व नंतर विदर्भ करू असे म्हणून हे विदर्भाचे नेते पुन्हा एक वेळा जनतेला धोका देणार आहे. म्हणून आजच्या बैठकीत ठरले की, येत्या २0१९ च्या निवडणुकी अगोदर विदर्भ राज्याची निर्मिती करा अन्यथा विदर्भातून चालते व्हा असे श्लोगन देऊन भाजपाचा निषेध केला. येत्या निवडणुकीत भाजपाला पाडा यासाठी ९ ऑगस्ट २0१८ पासून एक आंदोलनाची साखळी विदर्भ राज्य आंदोलन समिती उभी करीत असून निवडणूक हे सुद्धा आंदोलनच आहे. त्यात या पक्षाला विदर्भातून हद्दपार करा अशी जनजागृती करण्यात येणार आहे.