सेल्फीच्या नादात दोन तरुणीचा वाघ नदीत बुडून मृत्यू

0
13

गोंदिया,दि.30ः- गोंदिया तालुक्यातून महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरुन वाहणार्या वाघ नदीतील पूर बघण्यासाठी गेलेल्या गोंदियातील दोन तरुणींचा सेल्फी घेतांना नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारला दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.त्या मृत मुलीमंध्ये मेघा सुखदेव शहारे(वय 21,रा.खमारी,ता.गोंदिया) व समता कन्हैयालाल न्यायखरे(वय20,गिरोला/दासगाव,ता.गोंदिया) यांचा समावेश आहे.गोंदियाच्या मरारटोली स्थित युवा परिवर्तन संस्थेत( स्कील डेव्हलपमेंट संस्था) या मुली प्रशिक्षण घेत होत्या. आपल्या सहकारी 9 मैत्रिणींसोबत त्या आज रजेगाव घाट परिसरातील बाघनदीचा पूर बघण्यासाठी गेलेल्या होत्या.नदी पात्रातील पुरासोबत आपले सेल्पी घेत असताना या दोन विद्यार्थिनींचा तोल सुटला आणि त्या पाण्यात बुडाल्या.लगेच सोबत असलेल्या विद्यार्थीनी याची माहिती दिली.त्या माहितीच्या आधारे रावणवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार व आपत्ती व्यवस्थापन विभागचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत,शोधमोहीम राबविली.दोन्ही मुलींचे मृतदेह मिळाले असून उत्तरीय तपासणीकरीता गोंदियाच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात येणार आहे.