रेल्वे उड्डाणपुलावरून रेल्वे व जिल्हाप्रशासनात संघर्ष

0
14
सुरक्षा व जिवापेक्षा राजकारण्यांना वाटते वाहतुक महत्वाची
राजकीय नेत्यांच्या दबावात जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांची गोची
गोंदिया,दि.02 : काही दिवसांपूर्वी मुंबई येथे रेल्वेचा एक जुना उड्डाण पूल कोसळल्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रक परिसरात येणार्या सर्व उड्डाण पुलाची माहिती घेवून जे उड्डाण पूल जीर्ण झाले आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावरील जीर्ण झालेल्या जुन्या उड्डाणपुलासंदर्भात रेल्वे विभाग कुठलीही जोखीम पत्कारण्यास तयार नाही. ते पाडण्याची व त्यावर उपाय योजना सुरू  करण्याची मोहीम सुरू  केली.त्यांतर्गत गोंदिया येथील 66 वर्षापुर्वी तयार करण्यात आलेल्या उड्डाण पूलाचे स्ट्रक्टर ऑडिट केेले असता ट्रकवरील भागातील पुल धोकादायक असल्याचे समोर आले.त्यानंतर रेल्वेने लगेच जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन प्रवाशांसह नागरिकांची सुरक्षा लक्षात घेत पुलावरून वाहतुक बंद करुन पुल पाडण्यासंबधीचे पत्र दिले.त्यानंतर जिल्हा प्रशासन,रेल्वे व लोकप्रतिनिधी यांच्यात या पुलावरील वाहतुकीला घेऊन संघर्ष सुरु झालेला आहे.त्यातच रेल्वे प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत ते या पुलावरून वाहतुक सुरु ठेवण्याच्या पक्षात नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.तर येथील स्थानिक आमदार मात्र या पुलावरुन  केल्यानंतर पूल पाडण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे.  रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ञ चमूने पुलाचे बारीक सर्वेक्षण करुन आणि सर्व तांत्रिकबाबीची पडताळणी करुन १० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
याच जुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविली होती. त्या बैठकीत जीर्ण झालेल्या जुन्या उड्डाणपुलाच्या विषयावर तोडगा काढण्यासंबधी चर्चा करण्यात आली.त्यावेळी रेल्वेच्या अधिकार्यांनी पुलाचे पुन्हा स्टक्चर आॅडिट होणार असून पुर्वी दिलेल्या अहवालानुसार पुलावरील वाहतुक बंद करुन तातडीने पुल पाडण्याची प्रकिया करण्यावरच भर दिल्याची माहिती समोर आली आहे.यासंबधी रेल्वेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यानी महाराष्ट्र सरकारच्या सचिवस्तरावरील अधिकार्यांनाही माहिती देत पुलावरील वाहतुक तातडीने बंद करण्याबाबत कळविल्याची माहिती समोर आली आहे.
यावरुन रेल्वेप्रशासन या पुलाच्या बाबतीत कुठलीच तडजोड करण्याच्या तयारीत दिसून येत नाही.तर दुसरीकडे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होईल. तसेच शहरवासीयांना त्रास सहन करावा लागले. त्यामुळे जुना उड्डाणपूल पायी जाण्यासाठी व हलक्या वाहनासाठी सुरू ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे लावून धरली. त्यानंतर प्रशासनाने अग्रवाल यांच्या मागणीनुसार या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.३०) सांयकाळी जुन्या उड्डाणपुलावरुन जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची अधिसूचना काढली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकिला रेल्वेच वरिष्ठ अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पुलाचा तपासणी अहवाल येईपर्यंत हलकी वाहने या पुलावरुन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला गेला असून वरिष्ठ पातळीवर आणि जिल्हाप्रशासनाच्यावतीने लवकरात लवकर सुरक्षेला घेऊन याबाबत तोडगा निघावा अशा सुर जनतेतूनही येत आहे.