शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा द्या :-रमेश हलमारे

0
55
नितीन लिल्हारे/मोहाडी,दि.02 : अनेक वर्षा पासुन विधुत वितरण कंपणीच्या निष्काळजी पणाचा फटका या मोहाडी भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाची विघुत पुरवठा आठ तास असल्याने कधी ओव्हरलोड तर कधी ब्रेकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे सिंचन  होत नाही. हा प्रकार जांब- धोप फिडरमध्ये अधिक घडत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे़, ब्रेकडाऊनमुळे शेतकऱ्यांना फक्त 6 तासही वीज वितरण होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा देण्याची मागणी भाजपा सोशल मीडिया मोहाडी तालुका अध्यक्ष रमेश हलमारे यांनी आमदार चरण वाघमारे यांच्या कडे मागणी केली होती, त्यामार्फत वाघमारे यांनी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
शेतपंपांना मोफत वीज खंडित पद्धतीने देण्यापेक्षा अव्याहतपणे, शहरी भागांना होतो तसा वीजपुरवठा ग्रामीण भागास आणि शेतीसाठी झाला तर शेतकरी विजेचे बिल भरतील शेतकऱ्यांना वीज कंपनीने निर्धारित केलेले प्रति-दिन प्रमाणे दिवसा – रात्री पुरवठा आठ तास असेल तर आठ तास याप्रमाणे आहे. परंतु अध्र्याअधिक ठिकाणी वितरण व्यवस्था अपुरी असल्याने वीज कंपन्यांचे स्थानिक अधिकारी, कंपनीच्या परिभाषेत ‘फोस्र्ड् लोडशेडिंग’ लागू करतात. अशा परिसराला त्यांच्या नियमानुसार ते केवळ पाच ते सहा तास वीज पुरवतात. शिवाय निर्धारित कालावधीत होणारा वीजपुरवठाही अत्यंत व्यत्ययकारी वा अनियमित म्हणजे तास-दोन तासाला गायब होत असतो. शेतकऱ्यांना सिंचन सुविधेत खंड पडू नये व शेतकऱ्यांना ८ तासऐवजी १६ तास वीज पुरवठा मिळावा याकडे महावितरणने लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी भाजपा सोशल मीडिया मोहाडी तालुका अध्यक्ष रमेश हलमारे व शेतकऱ्यांनी केली आहे़.
गेल्या काही वर्षात आपल्या देशात शेती आणि शेतीच्या विकासाचे प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसतात. याचे कारण बातम्यांमध्ये शेतकरी आत्महत्या आणि शेतक-यांची आंदोलने किंवा कर्जमाफीसारख्या राजकीय मागण्या आपल्याला वाचायला-पहायला मिळतात. या प्रश्नाबाबत बोलताना देश स्वातंत्र्य झाला तेव्हा पासुन शेतीच्या विकासाला योग्य दिशा मिळाली नाही. यामागची कारणे राजकीय, सामाजिक तसेच भौगोलिक आणि जागतिक आहेत हे देखील जाणवते. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना वीज देयक अदा करणे शक्य नसते. परिणामी, शेतकरी महावितरणचे थकबाकीदार होतात. शेतकऱ्यांची कृषी पंपाची लाईन
रात्रीला सुरू राहल्याने शेतकऱ्यांना मोठ्या रकमेची देयके येतात. काही शेतकरी ही रक्कम प्रत्येक महिन्यात अदा करण्याची क्षमता ठेवतात तर काहींना ते शक्य होत नाही. परिणामी, ते वर्षानुवर्षे महावितरणचे देयक अदा करू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मोठ्या रकमा थकित होतात.
त्यामुळे शेतकरी गोत्यात येतो आणि आर्थिक विकासा पासुन कोशो दूर राहतो. कृषी पंपाची लाईट केव्हा येईल केव्हा जाईल यांचा नेम राहत नाही, रात्रीला वीज पुरवठा असल्याने शेतकरी शेतावर धाव घेतात व घरच्या महिलांना नवऱ्याची  काळची करावी लागते. शेतकऱ्यांना १६ तास वीज पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार नाही. पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे पाण्याची समस्या भेडसावत आहे, त्याकरिता शेतकऱ्यांना १६ तासाबरोबर दिवसापाळीची जास्त प्रमाणात वीज दिल्यास पाण्याची  बचती बरोबर विजेचीही बचत होईल. व घरच्या महिलांना नवऱ्याची काळची करावी लागणार नाही अशा पर्यायाने शेतकरी सुखी समाधानी होण्याची प्रक्रिया सुरू होईल.