शेकडोंच्या संख्येने जिल्ह्यातील ओबीसी मुंबई महाधिवेशनाला रवाना

0
8

गोंदिया,दि.०५-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने मुंबई येथे ७ ऑगस्ट रोजी आयोजित तिसèया राष्ट्रीय महाधिवेशनात सहभागी होण्यासाठी गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाचे ५०० च्यावर पदाधिकारी,कार्यकर्ते आज विदर्भ एक्सप्रेस व दुरोंतेने रवाना झाले.रेल्वेस्थानकावर ओबीसी कार्यकत्र्यांनी जोरदार केलेल्या घोषणाबाजीमुळे रेल्वेपरिसर दणाणून सोडला होता.जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,प्रा.काशिनाथ हुकरे,कमलबापू बहेकार,सावन कटरे,कैलास भेलावे,सुनिल भोंगाडे,दिनेश हुकरे,हरिष ब्राम्हणकर,मनोज डोये,राजेश कापसे,हरिष कोहळे यांच्या नेतृत्वात ५०० वर ओबीसी समाजबंधु भगिणी ओबीसी महाधिवेशनासाठी रवाना झाले.रेल्वेस्थानकावर लक्ष्मण नागपुरे,खेमेंद्र कटरे,जितेश राणे,शिशिर कटरे,रामकृष्ण गौतम,जगदिश बोपचे,जिवनलाल शरणागत,संतोष वैद्य,गणेश तुरकर,मनोज शरणागत,लिलाधर गिर्हेपुंजे,देवानंद बिसेन,बी.पी.ठाकरे,गौरव बिसने,लिल्हारेजी, प्रेमलाल साठवणे,मालती कापसे,माधुरी भेलावे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे   राष्ट्रीय   महाअधिवेशन  येत्या ७ ऑगस्ट रोजी मुबंई येथे  आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाच्या निमित्ताने देशाच्या विविध राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते एकाच मंचावर येणार आहेत. मुबंईच्या नॅशनल स्पोट्र्स कल्ब ऑफ  इंडिया डोम ,लाला लजपतराय  मार्ग,हाजी अली जवळ  मंडल आयोग दिनी आयोजित या महाअधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे हस्ते होणार असून याप्रसंगी हंसराज अहीर, केन्द्रीय गृहराज्यमंत्री,अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसेच उद्घाटन कार्यक्रमास आमदार छगनराव भुजबळ, आमदार एकनाथराव खडसे,आमदार जयदत्त क्षिरसागर,माजी आमदार माणिकराव ठाकरे मुख्य अतिथी म्हणून पंकजाताई मुंडे मंत्री,महिला व बालकल्याण,दिपक सावंत,आरोग्यमंत्री,चंद्रशेखर बावनकुळे उर्जामंत्री,महादेवराव जानकर,दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री,प्रा.राम qशदे,विजाभज, इमाव व विमाप्र मंत्री,खासदार राजकुमार सैनी,खासदार डॉ.बी.नरसय्या गौड,खासदार राजीव सातव,आमदार विजय वडेट्टीवार,माजी खासदार नाना पटोले,आमदार सुनिल केदार,आमदार सुधाकरराव देशमुख,आमदार परिणय फुके,आमदार डॉ.आषिश देषमुख,अविनाश वारजुरकर,वामनराव चटप,डॉ.शकील उझ झमान अन्सारी,अविनाष लाड,डॉ.हरि एप्पन्नापल्ली,पुल्ली रवि,प्रमोद मानमोडे या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे.