नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातर्फे जागतिक व्याघ्र दिन

0
13

लाखनी,दि.06ः-नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियामार्फत जागतिक व्याघ्र दिन कार्यक्रम  गडेगाव डेपो लाखनी येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनसंरक्षक मणिकंदन रामानुजम हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वन्यजीव तज्ज्ञ व सेवा नवृत्त वनअधिकारी अजय पिलारीसेठ, पोलिस अधिक्षक विनीता शाहु, उपवनसंरक्षक विवेक होसिंग, नवेगावबांध नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र उपसंचालक अमलेंदू पाठाक, मानद वन्यजीव संरक्षक राजवुष्ठमल जोब, मुकंद धुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा उद्देश्य, वाघ व वाघांच्या जंगलाचे महत्त्व या बाबतची माहिती आपल्या प्रास्ताविकातून अमलेंदू पाठक यांनी दिली. त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाघ, जंगल व वन्यजीव संवर्धनाचे संदेश देणारे पथनाट्य कविता तसेच नृत्य साजरे केले.
व्याघ्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर पेंटिंग, प्रश्नमंजुषा, छायाचित्र स्पर्धा आयोजितच करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये यश मिळणार्‍या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. जागतिक व्याघ्रदिन सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांनाही (ईडीसी) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे ग्राम परिस्थितीकीय विकास समिती रामपुरी हिला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना ५१ हजार रुपयाचे रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पुरस्कार कोका अभयारण्याच्या चंद्रपुर समितीस प्राप्त झाला. त्यांना ३१ हजार रुपयाचे रोख पारितोषीक स्मृतीचिन्ह देण्यात आले तर निपरटोला व सीतेपार ग्राम परिस्थितीकीय विकास समितीस विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात आले असून रोष ११ हजार रुपयाचे पारितोषीक व स्मृतीचिन्ह बहाल करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक अमोल चौबे व वैशाली खोडे यांनी तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी कु. आर.सी. वैद्य यांनी मानले.