खवल्या मांजर तस्करी प्रकरणातील आरोपींची संख्या २३

0
50

गोंदिया,दि.11ः-अतिशय दुर्मिळ वन्यप्राणी खवल्या मांजरची शिकार केल्याप्रकरणी ९ जुलै रोजी काही आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर आरोपींची संख्या २३ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आरोपींकडून दोन जिवंत खवल्या मांजरदेखील हस्तगत करण्यात आले.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून दुर्मिळ खवल्या मांजर या प्राण्याला पकडून खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची शिकारदेखील केली जात आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर धानोली येथे ९ जुलै रोजी काही आरोपींना जिवंत मांजरसह अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशी केली असता, या प्रकरणात आणखी टोळी सक्रिय आहे, अशी माहिती मिळाली. यावरून ३0 जुलै रोजी वन्यजीव विभागाने सेंदूरवाफा टोल नाक्यावर सापळा रचून खवल्या मांजर वाहतूक करणार्‍या टोळीला जेरबंद केले. एक-एक करता या प्रकरणात एकूण २३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना सडक अजुर्नी येथील प्रथम श्रेणी न्यायाधीशांकडे हजर करण्यात आले असता, १४ ऑगस्टपयर्ंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपींकडून दोन जिवंत खवल्या मांजरही ताब्यात घेण्यात आले आहे.
वन्यजीव विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खवल्या मांजरची तस्करी करणारी टोळीतील आरोपींना गोंदिया, भंडारा, नागपूर, मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथे छापेमारी करून वेगवेगळ्यात ठिकाणातून अटक करण्यात आली आहे. या टोळीमध्ये मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील काही उच्चपदस्थ व्यक्तीही सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ही कारवाई वनसंरक्षक रामानुजम, उपसंचालक अमलेंदू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक सदगीर, वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडगे, पी.एस. मोडवान, खोडगे, टुले, कु. रिता वैद्य व विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली.