बुद्धिष्ट समाज संघाचे ठाणेदाराला निवेदन 

0
12
गोंदिया,दि.13-  संविधान जाळणे, फाडणे व भारताच्या संविधानाला शिवीगाळ करणे आदी कृत्य करणाNयांवर देशद्रोही व एस. सी, एस. टी. अ‍ॅक्ट नुसार कडक शासन करावे यासाठी गोंदिया येथे बुद्धिष्ट समाज संघाच्यातीने  संबंधित  दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस निरिक्षकाला निवेदन सादर केले आहे.
याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, दि. ९ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्ली येथे जंतरमंतर मैदानात स्वतःला सवर्ण समजणाNया काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली आहे. तसेच आदर्श व्यक्ती बद्दल अपमानकारक शब्दांचा वापर करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरक्षण घेणाNया विशिष्ट समाजाला मुर्दाबाद हा शब्द वापरल्याने रावणवाडी येथे निवेदन सादर करण्यात आले आहे. असे कृत्य हे कायद्यानुसार गुन्हा असून सदर समाजकंटकांने सोशल मीडियावर या संबंधितांचे फोटो, व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केले. सदर व्हीडीओ निवेदनकत्र्याच्या मोबाइलवर आल्याने विविध सामाजिक संघटनेने थेट पोलिस स्टेशन गाठून दोषींवर कडक शासन करण्यासाठी लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदन सादर करतेवेळी  अ‍ॅड. अमरदिप गडपायले, अशोक आगलावे, धनरेंद्र भुरले, अशोक बेलेकर, दिपेंद्र वासनिक, आर.एस.मडामे,अ‍ॅड. उमराव गडपायले, गोंविद चौरे, राजेश चौरे, पप्पु वासनिक, एन.एस.भालाधारे, अ‍ॅड. प्रज्ञा डोंगरे, वी.सी.ऊके, अंजली चौरे, समता गणविर, यांचा समावेश होता.