नाभिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सोहन क्षीरसागर

0
7

सालेकसा,दि.022ः-महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत नाभिक समाज संघटना गोंदियाची जिल्हा बैठक येथील शुभमंगल कार्यालयात प्रांत उपाध्यक्ष अशोक चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत वर्तमान तथा भविष्य स्थितीवर समाजाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करुन सवार्नूमते अंतिम रूप देण्यात आले. विद्यमान जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार सोडल्यामुळे प्रांत कार्यकारीणीच्या पुढील आदेशापर्यंत जिल्हा उपाध्यक्ष सोहन क्षीरसागर यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष चेतन मेश्राम, सचिव सुरेश चन्ने, सतिश साखरकर, कोषाध्यक्ष घनश्याम मेश्राम, अशोक लांजेवार, सलून संघटनेचे जिल्हाध्यक्ष वासू भाकरे, सचिव दुलिचंद भाकरे, युवाध्यक्ष रविंद्र चन्ने, महेश उरकुडे, उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष सुशील उमरे, गोंदिया तालुका उपाध्यक्ष प्रदीप लांजेवार, आलोक लांजेवार, कोषाध्यक्ष चुन्नीलाल सूर्यवंशी आमगांव तालुकाध्यक्ष संतोष लक्षणे, तालुका महिलाध्यक्षा संगीता वाडकर, मनिष उरकुडे, महेश उरकुडे, तेजलाल चन्ने, हेमंत कौशिक आणि जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत नाभिक समाजाला इतर राज्यात ज्याप्रमाणे संविधानानुसार अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या सवलती मिळू शकतात, तर महाराष्ट्रात का नाही ? यावर चर्चा करण्यात आली. तसेच सर्व बाबींचा विचार करुन न्यायालयीन लढाई करण्यावर भर देण्यात आले. प्रास्ताविक आणि संचालन जिल्हा सचिव सुरेश चन्ने यांनी तर आभार तालुका उपाध्यक्ष प्रदीप लांजेवार यांनी मानले.