कोहमारा येथे जलयुक्त शिवार प्रशिक्षण कार्यक्रम

0
13

सडक/अजुर्नी,दि.26ः- मागील ४ वषार्पासून जलयुक्त शिवार अभियान राबविला जात आहे. अभियानाच्या माध्यमातून जलस्तर कसा वाढविता येईल यावर भर देण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना साकरण्यात येत आहे. त्यानुरूप तालुक्यातील कोहमारा येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत ग्राम पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे हे लाभले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी पात्रीकर, राजकुमार रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन एससीएन. सोसायटी फॉर इंटरप्रेन्येवरशीप एज्युकेशन अण्ड डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन भुपेंद्र मस्के यांनी तर आभार मधुर दिहारी यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते