बहुजन संघटनांनी काढली संविधान बचाव जनजागृती रॅली

0
12

अजुर्नी मोरगाव(संतोष रोकडे)दि.02ः- ९ ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतरमंतर येथे काही समाजकंटकांनी संविधानाची प्रत जाळल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून शनिवारला (दि.१) अजुर्नी मोरगाव येथे बहुजन समाजातील विविध संघटनांच्या वतीने संविधान बचाव जनजागृती रॅली काढून घडलेल्या प्रकाराचा निषेध केला. तसेच तहसीलदारामार्फत पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.
अजुर्नी मोरगाव येथील दुर्गा चौकातून शहराच्या प्रमुख मार्गांनी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये समता सैनिक दलाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तर डॉ.अंजय अंबादे यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली होती. रॅलीत भारतीय बौध्द महासभेचे सोमदास गणवीर, संभाजी ब्रिगेडचे उध्दव मेहंदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, बौध्द महासभेचे अध्यक्ष विजय लाडे, काँग्रेसचे नेते रत्नदीप दहिवले, आदिवासी समाज संघटनेचे लक्ष्मीकांत मडावी, ओबीसी संघटनेच्या सुनिता हुमे, आदिवासी महिला संघटनाच्या कोकोडे, समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ. अजय अंबादे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत सोनटक्के, आदिवासी गोवारी संघटनेचे होमराज ठाकरे, मनोहर ठाकरे, बामसेफचे नांदगावे, लोहार समाज संघटनेचे अनिल बावणे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत गणवीर, ओबीसी युवा नेते व सरपंच संघटनेचे अध्यक्ष दादाजी संग्रामे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी संविधानाची प्रत जाळणार्‍या समाजकंटकांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार गेडाम यांच्यामार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना पाठविण्यात आले.